भुसावळमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, शहर अध्यक्षपदी दीपक सोनवणे..

भुसावळमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन.. शहर अध्यक्षपदी दीपक सोनवणे, तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उत्स्फूर्त प्रवेश..

भुसावळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यविस्ताराला नवे बळ मिळत असून, भुसावळ शहरात जामनेर रस्त्यावर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते रविवारी सकाळी संपन्न झाले. या प्रसंगी नव्याने नियुक्त झालेल्या भुसावळ शहराध्यक्षपदी दीपक सोनवणे यांना जबाबदारी सोपवण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्यास मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुका अध्यक्ष तुषार वाढे आणि जळगाव शहर उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याला भुसावळ शहरातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्या जोमाने शहरातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश झाला. मनसेच्या झेंड्याखाली नव्या उमेदीनं तरुणाई एकवटत असल्याचं चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळालं. या वेळी बोलताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले, भुसावळ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संघटन अधिक प्रभावीपणे उभं करण्यासाठी ही नवी सुरुवात आहे. जनतेच्या प्रश्नांवर मनसे ठामपणे भूमिका मांडेल आणि भुसावळमध्ये पक्ष जनतेच्या हक्कांसाठी सतत लढा देईल.

जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत म्हटलं की, शहरातील युवकांना दिशा देणारे आणि परिवर्तन घडवणारे कार्य मनसेमार्फत घडवायचं आहे. संघटन म्हणजे केवळ पद नाही, तर जबाबदारीची शपथ आहे.

यांनी केला प्रवेश.. रोहित सपकाळे, विनीत पाटील, तुषार कोळी, मोहन शिरनामे, विशाल बोरनारे, निलेश बुबले, सुरज भंगाळे, रोशन भागवत, गणेश बोरनारे, सागर चौधरी यांनी प्रवेश केला. या प्रसंगी दशरथ सपकाळे, विलास कोळी, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, धीरज जाधव, विशाल ठाकूर, सुमित यावलकर,सुनिल डोळसे, मोहन घ्यार, दुर्गेश चोपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद पाठक यांनी मानले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.