जामठी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दयनीय अवस्था.

जामठी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दयनीय अवस्था.

बोदवड तालुक्यातील जामठी येथे ग्रामपंचायतीने गावातील चोरी ,घटना, दुर्घटना आधी रोखण्यासाठी व यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सन 2022 23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगामधून गावाच्या मुख्य रस्त्यालगत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र या कॅमेर्‍यांची प्रचंड दुरवस्था झालेली असल्याने ही योजना बंद पडलेली आहे . तरी काल रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा एक पोल कोसळल्याने पोल वरील सर्व कॅमेरे तुटून पडलेले दिसून आले.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की जामठी गावामध्ये पंधरावे वित्त आयोगातून चार लाख 17 हजार 366 खर्च करून गावाच्या मुख्य रस्त्यालगत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 24 कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले तरी ह्या योजनेची आगामी दोन वर्षाची मेंटनस पूर्ण जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांवर दिलेली होती मात्र दोन वर्ष संपल्यानंतर या ठिकाणचे सर्वच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ही बंद पडलेले असून अनेक ठिकाणी या कॅमेऱ्याची पोल खाली पडलेले आहे तर वायर तुटलेल्या आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गतली ही सुविधा पूर्णतः बंद पडलेली दिसून येत आहे . त्यामुळे ग्रामपंचायतीने केलेला लाखो रुपयांचा खर्च हा वाया गेलेला असून याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन घेणार नाही का असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याचबरोबर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिठाच्या गिरणीवरही लाखो रुपये खर्च करून ही गिरणी बंद पडलेली आहे तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचे आरो मशीन प्लांट हा गेल्या चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे तरी या सुविधा तातडीने द्याव्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.