
ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचरचा पुरवठा करण्याकरिता दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. पुण्याच्या बहुचर्चीत ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे रंगेहाथ पकडल्यानं खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयाच्या आवारातील, ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वरिष्ठ सहाय्यक आणि एक कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे
ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचरचा पुरवठा करण्याकरिता दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं.अशी माहिती एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १३% दराने १ लाख ३० हजार रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी मागितली.