सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने कठोर भूमिका घेत देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच, 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या संदर्भात सीमाच्या वकिलाने तातडीने महत्त्वाची माहिती दिली आहे. सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते.

ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला आहे. ती चार मुलांची आई आहे.सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यांनी सांगितले की सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.एपी सिंह म्हणाले की, सीमा आश्रयाच्या आधारावर भारतात राहत आहे आणि तिला भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा मानलेला भाऊ एपी सिंहला लाज वाटली पाहिजे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.