जवानाचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू.

पाचोरा : सुटीवर आलेल्या जवानाचा विहीरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला. हि घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८) असे मृत जवानाच्या नाव आहे. भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी रवींद्र पाटील आसाम रायफल मध्ये शिलॉंग येथे कार्यरत होते.

ते नुकतेच सुट्टीवर आले असताना गुरुवारी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेले होते. तेव्हा त्यांच्या विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी तपासून मृत घोषित केले. मुलगा पियुष व वडिलांनी अंत्यविधी केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी प्रांत व तहसील विभागातर्फे निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके छत्रपती संभाजी नगर येथून ९७ तोफखाना ब्रिगेडचे पथक नायब सुभेदार बेलगाम व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.