पुण्याच्या ससून रुग्णालायात एसीबीची मोठी कारवाई, १ लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहाथ सापडले.

ससून रुग्णालयाच्या ⁠बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचरचा पुरवठा करण्याकरिता दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. ⁠पुण्याच्या बहुचर्चीत ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे रंगेहाथ पकडल्यानं खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयाच्या आवारातील, ⁠ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वरिष्ठ सहाय्यक आणि एक कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे

⁠ससून रुग्णालयाच्या ⁠बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचरचा पुरवठा करण्याकरिता दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. ⁠याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं.अशी माहिती एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.दहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १३% दराने १ लाख ३० हजार रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी मागितली.

वाटाघाटीनंतर आरोपींनी १ लाखरुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली. तक्रारदार व्यावसायिकाने एसीबीकडे याबाबतची तक्रार दाखल केली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आणि ससून परिसरात सापळा रचण्यात आला. आणि जयंत चौधरी आणि सुरेश बोनावळे यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान ही कारवाई एवढ्यावरच न थांबता एसीबीमार्फत त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.ससून रुग्णालयाचे नाव चर्चेत येण्याची ही पहिलीवेळ नसून या आधीही रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयाचे नाव चव्हाट्यावर आले आहे. येरवाडा कारागृहात ठेवल्या जाणाऱ्या कैद्यांना काही वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार गैरवापर करत असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी उपचार सुरू असताना गुन्हेगार पळून गेल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    अजित पवार पाहणीसाठी गेले अन् थेट मदतीची घोषणा करून टाकली, नुकसानग्रस्तांना किती पैसे मिळणार?

     बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या…

    आम्ही नीलेश चव्हाणला पकडलंय, गाडीच्या डिक्कीत डांबून ठेवलंय, पोलिसांना फोन आला पण…

     “फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय” असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता पुण्यातील 24 वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

    मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

    साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.

    साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.

    आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन येतो! जोशी कुटुंबातील ३ भावंड घराबाहेर पडली, पण नंतर घडलं अघटित.

    आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन येतो! जोशी कुटुंबातील ३ भावंड घराबाहेर पडली, पण नंतर घडलं अघटित.

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं नायगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन!

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं नायगाव  ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन!