न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सोलापूर व राज्यातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात महत्वाची घडामोड झाली आहे. डॉ. वळसंगकरांना त्रास देत त्यांना मेल करणारी महिला संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांची शुक्रवारी पोलीस कोठडी संपली होती. शुक्रवारी 25 एप्रिलला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने मनीषा मुसळे माने यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. परंतु, भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार पोलिसांनी कोर्टात एक मागणी केली आहे.सध्या न्यायालयीन कोठडीत ठीक आहे, परंतु तपासासाठी गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी. संशयीत आरोपी महिला कर्मचारी मनीषा मुसळे माने यांच्या वकिलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितले की, खऱ्या बाबी अजूनही कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत, गृहकलहाची बाब कोर्टात समोर आलीच नाही.










