देवस्थान कमिटीच्या एकूण सहा विश्वस्तांपैकी तीन जागा रिक्त होत्या. या जागांवर ॲड. पवार, पाटील आणि लोंढे यांची निवड झाली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. ॲड. रोहिणी पवार यांनी पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान मिळवत इतिहास रचला आहे.झी टॉकीजच्या ‘गजर कीर्तन’ आणि बिग बॉस फेम ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर लोंढे यांचीही विश्वस्तपदी निवड झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी गुरुवारी ही नियुक्ती जाहीर केली.










