पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल जप्त.

दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर करण्यात आली. इंद्रायणी नदीच्या काठावर एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी गिरीराज चिम्मनराम बैरवा (वय ३५, रा. आळंदी. मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आढळले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करत गिरीराज याला अटक केली. दुसरी कारवाई सोमवारी (दि. ३१) वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात करण्यात आली. केत बाळासाहेब दौंडकर (वय २३, रा. कनेरसर, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संकेत दौंडकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

  • Related Posts

    अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्‍या दहा गोवंशाची सुटका.

    रावेर पोलिसांनी गोवंशाची कत्तल होण्यापासून सुटका करीत वाहन जप्त करीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीवरून कारवाईमध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर…

    तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

    केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

    ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

    दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

    दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

    सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !…

    सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !…

    विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.

    विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.