
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार मिळणार नसल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अमेरिकेतील इंटेलिजन्स अध्यक्षांच्या EVM संदर्भातील वक्तव्यावर चिंतन करा’, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच, ‘आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. लांड्या-लबाड्या करून सत्तेवर आलेल्या भ्रष्ट मंडळींना सांभाळा’, असे राऊत म्हणाले.भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली होती. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. अशातच यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी उत्तर देताना आमच्या पक्षाची चिंता करू नये, अमेरिकेमधील इंटेलिजन्सच्या अध्यक्षा Tulsi Gabbard यांच्या वक्तव्याचा धागा पकडत निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला निवडणुकीला उमेदवार राहतील की नाही याची चिंता करू नये. अमेरिकेमधील इंटेलिजन्सच्या अध्यक्षा Tulsi Gabbard यांनी EVM संदर्भात वक्तव्य केले आहे. EVM हॅक होऊ शकतं हे मी नाही Tulsi Gabbard यांनी म्हटलं आहे. ज्यांच्यावर मोदींचं खास प्रेम असून त्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवला हे सरकारच्या प्रिय मैत्रिणीने सांगितलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, आमच्या पक्षाचं काय करायचं यासाठी आम्ही समर्थ आहोत.आम्हाला महाराष्ट्रात अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच उल्लेश एकेरी केली, औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी समाधीचा दर्जा दिला. आम्हाला त्यांच्याबरोबर सत्ता नकोय. संजय राऊत कधीही सत्ता गेले नाहीत. हे त्यांना माहित नसेल तर सांगतो. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्यासोबत सत्तेत जायचं नाही. उद्धव ठाकरे यांनाही सत्तेत जायचं नाही. आम्ही एवढे लाचार आणि नीच नाही आहोत, चंद्रकांत पाटील यांनी स्वत:चर्चा आणि पक्षाची करावी. लांड्या-लबाड्या करून सत्तेवर आलेले आहेत. ती सत्ता तुम्हाला लकलाभो, भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्यासोबत बसलेलं आहे. तुम्ही त्यांना सांभाळत बस, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन उमेदवार मागावे लागत आहेत. पुण्यात तुमचं काय राहिलंय? ५ नगरसेवक भाजपात आले, मुंबईत ५७ नगरसेवक शिंदे गटात गेलेत. हे सगळं सोडून तुम्ही केवळ अमित शहा काय बोलले याकडे लक्ष देता आहात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.