मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले.‘अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मिर शांत होत होते, परंतु मंगळवारी काश्मीर पुन्हा अशांत झाले. पर्यटकांची संख्या वाढली होती, आता पुन्हा रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल,’ अशी भीती पहलगामचा नागरिक मुश्ताक अहमद वानी याने महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केलपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, पनवेलचे दिलीप देसले, तसेच पुण्याचे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा समावेश आहे. डोंबिवलीतील तीन मावसभावांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण डोंबिवली आणि कल्याण शहरावर शोककळा पसरली.

मंगळवारी दुपारी अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या वेळी पर्यटकांसोबत हजर असलेला मुश्ताक बैसरनमध्ये सहा वर्षांपासून छायाचित्रकार म्हणून पर्यटकांचा आनंद टिपत आहे.आठ वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेत भाविकांना खेचरावर बसवून यात्रेत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या तरुण मुश्ताकने सहा वर्षांपासून छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला आहे. मुश्ताकसारखे दोनशेपेक्षा अधिक तरुण तेथे जाणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढतात.मंगळवारीही मुश्ताकने अनेक पर्यटकांचे फोटो काढले होते. ‘गेल्या काही वर्षांत पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे इथल्या स्थानिकांना चांगला रोजगार मिळू लागला. हा रोजगार काही वर्षांसाठी थांबेल,’ अशी भीती त्याने व्यक्त केली.या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले. शांत, सुंदर अशा बैसरनमध्ये रडण्याचे, ओरडण्याचे चित्कार उमटत होते, असे तो म्हणाला.बैसरनमध्ये पायी अथवा खेचरांशिवाय जाण्याची दुसरी कोणतीही व्यवस्था नाही. मात्र आता यात खंड पडणार आहे. पहलगामसह सर्वत्र स्मशानशांतता पसरली आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांना आता रोजगाराचा प्रश्न आहे. आम्हाला पर्यटकांचा आनंद टिपायचा आहे, असे तो म्हणाला. मी घरी पोहोचल्यानंतर माझ्या आईने टाहो फोडला, मलासुद्धा रडू आवरता आले नाही, असे सांगताना तो भावविवश झाला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.