जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊल उचलली आहेत. शिंदे स्वत: जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणले जात आहे, जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानाने परत आणत आहोत,’ असे विधान म्हस्के यांनी केले, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत. अनेक नागरीक भयभयीत झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत यायचं आहे. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरला गेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.










