सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

विरारमध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हे बाळ आईच्या कडेवर असताना ते खिडकीतून थेट खाली पडल्याची माहिती आहे. सात महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला सुरुवात केली होती, त्याचा 21 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना विरार परिसरात घडली आहे. आईच्या कडेवरुन हे बाळ खाली पडल्यांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खिडकी बंद करत असताना आईचा तोल गेला आणि तिच्या कडेवरील सात महिन्यांचे बाळ एकवीसाव्या मजल्यावरून खाली पडलं. यात त्या सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विरारच्या बोळींज परिसरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.विकी सदाने आणि त्यांची पत्नी पूजा सदाने हे दाम्पत्य विरार येथे बोळींज परिसरातील जॉय विले नावाच्या निवासी संकुलात वास्तव्यास आहे.

या निवासी संकुलातील एकविसाव्या मजल्यावर हे दाम्पत्य राहत असून सदाने दाम्पत्य सात महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले होते. या दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षांनी बाळ झालं होतं, त्यामुळे हे बाळ त्यांच्यासाठी खूप खास होतं. त्यांना मुलगा झाला असून त्याचं नाव व्रिशांक ठेवण्यात आले होते.पती विकी सदाने नेहमीप्रमाणे कामावर गेले होते व बाळाला बघण्यासाठी घरात त्यांचे काही नातेवाईक आले होते. पूजा सदाने यांनी त्यांच्या बाळाला कडेवर घेतले होते. याचदरम्यान बाळाला खांद्यावर घेऊन त्या खोलीतील खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. खिडकीजवळ लादीवर पाणी असल्याने त्यांचा पाय घसरला. पाण्यावर पाय घसरून तोल गेल्यामुळे पूजा सदाने यांच्या कडेवर असलेले त्यांचे सात महिन्यांचे बाळ २१ व्या मजल्यावरील त्यांच्या खोलीच्या खिडकीतून खाली पडले. बुधवारी (२३ एप्रिल) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. व्रिशांकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इमारतीच्या एकवीसाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.खिडकी बंद करताना कडेवरील बाळ खाली पडले, ज्या खिडकीतून बाळ खाली पडले त्या खिडकीला पूर्ण जाळी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. सात महिन्याच्या बाळाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सदाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.