आधी लग्नाचं आमिष, मग संबंधाचे चित्रीकरण करुन ब्लॅकमेल, तब्बल १२ वर्ष महिलेवर सरपंचाकडून अत्याचार, अखेर…

 हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने पीडित महिलेबरोबर सन २०१०मध्ये प्रेमाचे नाटक करीत लग्न करणार असल्याचे सांगत त्याने दिनांक १ जानेवारी २०१३ ते १६एप्रिल २०२५ दरम्यान अनेकदा शरीरसंबंध ठेवले. आरोपी सरपंच राकेश दाभाडे याला पीडित महिला ही खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार देवुन, मोबाईलमध्ये काढलेल्या अश्लिल फोटोंचा फायदा घेऊन पीडित महिलेस भेटण्यास बोलावुन झी गार्डन हॉटेल, कोंबडपाडा, रामवाडी, युनायटेड बिल्डींग येथे दि. १२/०४/२०२५ पर्यंत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.महाराष्ट्रात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असतानाच पेण तालुक्यातील हमरापूर येथील सरपंच राकेश दाभाडे याने एका पीडित महिलेशी प्रेमाचे नाटक करीत, तालुक्यातील विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबतची तक्रार पीडित महिलेने पेण पोलिस ठाण्यात दिली आहे. आरोपी राकेश दाभाडे याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने पीडित महिलेबरोबर सन २०१०मध्ये प्रेमाचे नाटक करीत लग्न करणार असल्याचे सांगत त्याने दिनांक १ जानेवारी २०१३ ते १६एप्रिल २०२५ दरम्यान अनेकदा शरीरसंबंध ठेवले. आरोपी सरपंच राकेश दाभाडे याला पीडित महिला ही खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार देवुन, मोबाईलमध्ये काढलेल्या अश्लिल फोटोंचा फायदा घेऊन पीडित महिलेस भेटण्यास बोलावुन झी गार्डन हॉटेल, कोंबडपाडा, रामवाडी, युनायटेड बिल्डींग येथे दि. १२/०४/२०२५ पर्यंत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.तसेच सदर बाबत पीडित महिला ही आरोपीची पत्नी अक्षता दाभाडे हिला सर्व हकिगत सांगण्याकरीता दि. १६/०४/२०२५ रोजी हमरापूर येथे गेली असता, अक्षता हिने पीडित महिलेस “तू खालच्या जातीची आहेस” असे बोलल्यानंतर पीडित महिलेने अक्षता हिला शांतपणे बोलण्याबाबत सांगितले. त्यावर सरपंच राकेश दाभाडे म्हणाला की, “माझी पत्नीसोबत नीट बोल व तुला जे काही करायचे आहे ते कर. तुम्ही सर्व खालच्या जातीचे आहात” असे बोलुन पीडित महिलेस जातीवाचक बोलुन अपमानीत केले.पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पेण पोलिस ठाण्यात भा.न्या.स.कलम ६४,६४(२),( एम ),३५१( २ ),३( ५ ), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ( ३ ) ( आर ),३( १ ) ( एस ) ३ ( १ ) ( डब्ल्यू ) ( i) ( ii ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. दरम्यान आरोपीस दिनांक २१एप्रिल २०२५ रोजी रात्री दहा वाजता अटक केले. आरोपी राकेश दाभाडे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.