विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.

जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील एक तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका मित्राला तेथील भाविकांनी वाचवले आहे.यावल तालुक्यातील न्हावी येथील मोलमजुरी करणाऱ्या कोलते परिवारातील दर्पण निलेश कोलते (वय, १८ वर्षे) व त्याचे मित्र मनोज रघुनाथ कापडे, दिगंबर निलेश पवार आणि चाळीसगाव व परडी येथील दोन तरुण असे पाच मित्र औरंगाबाद येथे गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकल कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.

दिगंबर पवार हा रावेर येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून, तीन दिवसांची सुट्टी असल्याने पाचही मित्रांनी विठुरायाचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि ते पंढरपूरला रवाना झाले.तिथे मनोज कापडे, दिगंबर पवार आणि मयत दर्पण कोलते हे चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ अंघोळीसाठी गेले असता यातील मनोज आणि दर्पण हे दोघं उतरले. त्यात नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तिथे दर्पणचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला तर दुसरा मनोज पाण्यात बुडत होता. त्याला दिगंबर पवार हा नदीकाठी बसलेला असल्याने त्याने आरडाओरड केली व भाविकांना जमा केले. तात्काळ भाविकांनी मनोजला वाचविले.दर्पण मात्र बुडाला असल्याने आठ तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजता न्हावी गावात आणण्यात आला, अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्पण कोलते हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. आई वडील मजुरी करतात व दोन्ही मुलांचे शिक्षण करीत होते. लहान भावाने इयत्ता दहावीची परीक्षा नुकतीच दिलेली आहे. तर मोठा भाऊ औरंगाबाद येथे पॉलीटेक्निक कॉलेजला शिक्षण घेत होता. अशा या कठीण परिस्थितीत या तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

     केरळ पोलिसांनी अभिनेत्रींसंदर्भात आक्षेपार्ट टिप्पणी करणाऱ्या एका युट्यूबरला अटक केली आहे.दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या YouTuber ला अटक केल्याची घटना केरळमध्ये घडली. एर्नाकुलम पोलिसांनी अटक केलेल्या या युट्यूबरचे…

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

     पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…