पाकिस्तानने आता भारतीयांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतीयांना आता ४८ तासांचा अल्टीमेटम नेमका कशासाठी दिला आहे, जाणून घ्या…कराची : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत बरेच निर्णय घेतले आहेत. पण आता पाकिस्तानही शांत बसलेली नाही. पाकिस्तानने आता भारतीयांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने यावेळी भारतीयांना ४८तासांची मदत दिल्याचे समोर आले आहे.पाकिस्तानचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. कारण भारताने त्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयदेखील यामध्ये मागे नाही. पाकिस्तानला जगासमोर कसा मोठा धक्का द्यायचा, याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानबाबत कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानच्या लोकांना आता लवकरच त्यांच्या देशात पाठवणार आहेत आणि त्याची तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही आता मोठं पाऊल उचललं आहे.










