अकोल्यात सुशिक्षित कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. तिच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यांच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. तिच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.अकोला जिल्ह्यातील संतोष नगर या परिसरात वास्तव्यास असलेली अवंती भास्कर शेळके वय १४ वर्ष आठवीमध्ये शिक्षण घेत होती. अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निशू नर्सरी या शाळेत शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे, आश्चर्य व्यक्त केला जात आहे.










