पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

 पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख नावाच्या आरोपीला एअरगनसह ताब्यात घेतले, त्यानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पुण्यात एका घरावर अचानक गोळीबार झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या घरात सर्वसामान्य नागरीक वास्तव्यास आहेत. त्यांचा कुणासोबत वादही झालेला नव्हता. असं असताना अचानक अशाप्रकारचा गोळीबार कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना पुण्यात गोळीबाराची घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. सुदैवाने या गोळीबारात संबंधति घरातील कुणालाही इजा पोहोचली नाही. पण या घटनेमुळं घरातील रहिवासी घाबरले. या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करत गोळीबार करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कोंढवा येथील सर्व्हे नंबर 63 शालिनी कॉटेज प्लॉट नंबर 25 साळुंखे विहार येथे मनोज श्रीकांत कानडे (वय 50 वर्षे) हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरावर काल अचानक अज्ञात इसमाने चार राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मनोज कानडे यांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन दिली. त्यांच्या या तक्रारीची पोलिसांकडून तातडीची दखल घेण्यात आली.संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक रऊफ शेख आणि तपास पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. यावेळी मनोज कानडे यांच्या खालच्या घराच्या किचनच्या खिडकीवर एक खड्डा पडल्याचं बघायला मिळालं. ही घटना म्हणजे राऊंड फायर असल्याची संभाव्यता व्यक्त करण्यात आली.पोलिसांनी तपास केला असता, पहिल्या मजल्यावर स्वयंपाक घराच्या खिडकीवर चार खड्डे पडल्याचे दिसले. पोलिसांनी सखोल तपास केला. फायरिंग नेमकी कोणत्या दिशेला झाली याचा अंदाज घेतला. यावेळी पोलिसांनी परिसरात तपास केला. पोलीस गोळीबाराची दिशा शोधत समोरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर गेले. रोषमा रेजन्सी फ्लॅट नंबर दोन असा तिथला पत्ता आहे.पोलिसांनी तपास केला असता तिथे 29 वर्षीय बिलाल जुल्फीकार शेख नावाचा तरुण राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांकडे आपल्या कृत्याची कबुली दिली. आपण एअरगनच्या मदतीने पाच छरे फायर केल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी तुटलेल्या छर्राचे दोन तुकडे सापडले आहेत. आरोपी बिलाल यास एअरगनसह ताब्यात घेण्यात आलं. त्याला कोंढवा पोलीस ठाणे येथे घेऊन जाऊन पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.