केरळ पोलिसांनी अभिनेत्रींसंदर्भात आक्षेपार्ट टिप्पणी करणाऱ्या एका युट्यूबरला अटक केली आहे.दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या YouTuber ला अटक केल्याची घटना केरळमध्ये घडली. एर्नाकुलम पोलिसांनी अटक केलेल्या या युट्यूबरचे नाव संतोष वर्की असून तो सोशल मीडियावर ‘आरात्तनन’ म्हणून ओळखला जातो. शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी, केरळ पोलिसांनी ही कारवाई केली. Malayalam Film Industry मधील अभिनेत्रींबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. या इंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांनी सांगितले की, संतोषविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की तो वारंवार महिला अभिनेत्री आणि इंडस्ट्रीतील इतरांबद्दल अश्लील टिप्पण्या पोस्ट करतो.










