भागो भागो यहाँ खतरा हैं…! क्षणाचा विलंब अन् जीव वाचला; नागपूरकरांनी सांगितला पहलगाम हल्ल्याचा थरार.

नागपुरातील वानाडोंगरी येथे राहणारे अरविंद होटे काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला.’निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी आम्ही काश्मिरात पोहोचलो. कुटुंब आणि मित्रपरिवार अशा १५ जणांच्या आमच्या चमूने मनसोक्त आनंद घेतला. वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आम्ही पहलगाम येथे पोहोचलो. बैरसन व्हॅली येथे जाण्यासाठी घोडाही केला. तिथे पोहोचत असतानाच गोळ्या झाडल्याचा आवाज कानी घुमला. ‘भागो भागो यहाँ खतरा हैं असे सांगत काही लोक धावत आले. नेमके काय होत आहे, हे काहीच कळत नव्हते. तसाच पळ काढला आणि मंदिराचा आश्रय घेतला…’ नागपुरातील वानाडोंगरी येथे राहणारे अरविंद होटे काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगत होते.शनिवारी सकाळी होटे आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील मित्रपरिवार सुखरूप नागपुरात परत आला.

निवृत्त शिक्षक असलेल्या होटे यांनी १६ एप्रिलला आपल्या काश्मीर सहलीला सुरुवात केली होती. मित्र, कुटुंब सोबत असल्याने सर्वकाही छान सुरू होते. वैष्णवदेवी मंदिर, मुघल गार्डन, ट्युलिप गार्डन, गुलमर्ग यांसारख्या विविध स्थळांना भेटी देऊन सर्व आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. ‘आमच्या सोबत असलेले विद्या इंगळे, रामराव भाकरे, आरती भाकरे, देवानंद कापडे, लता पाटणकर असे सर्वच जण खूप खूश होतो. पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरला नंदनवन का म्हटले जाते, याची प्रचिती त्यांना येत होती’, असे होटेंनी सांगितले. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी पहलगाम येथील बैरसन व्हॅली बघण्यासाठी होटे व त्यांचा मित्रपरिवार निघाला. बसने त्या व्हॅलीजवळ सगळे येऊन पोहोचले. घोड्याने अंतर पार करणार तेवढ्यात हल्ल्याचा थरार त्यांच्या कानी पडला.‘आता कुठे पळायचे, हेच कळत नव्हते. काश्मिरातील काही माहितीही नव्हती. वाहनचालकाने ‘माझ्या घरी चला’, असे सांगितले. मात्र, सुरक्षारक्षकांनी ‘कुणाच्या घरी थांबू नका’, असा सुरक्षेचा सल्ला दिला.

त्यानंतर आम्ही शंकराचार्य यांच्या एका मंदिरात पोहोचलो. प्रत्येकाच्या मनात भीतीचे काहूर दाटले होते. आता देवच आपल्याला वाचवेल, हीच अपेक्षा ठेऊन नामस्मरण सुरू केले. उपाशीपोटी मंदिरातच रात्र काढायची असे ठरले. तेवढ्यात बाजूच्या एका पेट्रोलपंप चालकाला आम्ही मंदिरात थांबलो असल्याचे कळले. त्याने तेथील एका कर्मचाऱ्याला आमच्या मदतीला पाठविले. मंदिरातच आमच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने त्याच्या घरी आमची राहण्याची व्यवस्था केली. संकटातही असा माणूसरूपी देव भेटतो, याची प्रचीती काश्मिरात आली’, असे अरविंद होटे म्हणाले.काश्मीर हल्ल्यानंतर तेथील पर्यटकांना परत आपल्या गावी पाठविले जात आहे. नागपुरातील २५०पैकी आतापर्यंत सुमारे १२५ पर्यटक नागपुरात दाखल होतील. कुणी विमानाने तर कुणी रेल्वेने येत आहेत. उर्वरित पर्यटकही लवकरच नागपुरात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘आम्ही आमची सहल अर्धवट सोडून आलो’, असे देवराव जगताप, अमोल पारडकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.