पुणे हादरलं; ना नाव ना चेहरा, छिन्नविछिन्न अवस्थेतील बॉडी पाहून अंगाचा थरकाप.

पुण्यात एक शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असून शीर नसल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगांव गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरगांवमधील दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगांव परिसरात काही स्थानिक गुराखी हे गुरे चारण्यासाठी डोंगराळ भागात गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. तेव्हा काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून आला.

हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली आहे.

मृतदेहाचे शीर नसल्याने आणि हातपाय बांधलेले असल्याने हा खून नियोजनबद्धरित्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शीर शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु आहे. मात्र, अद्याप या धडाचं शीर सापडलेलं नाही.वरंध घाट हा दुर्गम आणि कमी वर्दळीचा मार्ग असल्याने येथे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे आव्हानात्मक आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.