अनिल राणेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई; जिद्दीला सलाम.

रामदास कॉलनीतील अनिल राणे यांनी जगातील सर्वात खडतर आणि लोकप्रिय ट्रेक्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकची यशस्वी पूर्तता करून जिद्द, चिकाटी आणि मानसिक बळ याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांनी हा ट्रेक पूर्ण केला.

काठमांडूपासून सुरु होणारा आणि परत काठमांडूपर्यंत असणारा हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण १४ दिवस लागले. दरम्यान, -२० अंश सेल्सिअस तापमान, फक्त ८-१० टक्के ऑक्सिजन असलेले विरळ वातावरण, बर्फवृष्टी, हिमनद्यांवरून चालणे आणि खडबडीत पर्वतीय भूप्रदेश यामुळे हा ट्रेक अत्यंत कठीण बनला होता. मात्र या सर्व अडचणींवर मात करत  राणे यांनी यशाचे शिखर गाठले.ते सतीश राणे यांचे धाकटे भाऊ असून फिटनेस आणि साहस प्रेमासाठी ते ओळखले जातात. दरवर्षी १० किमी मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या राणे यांनी यंदा २५ फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या पिंक सिटी मॅरेथॉनमध्ये वरिष्ठ नागरिक विभागात तिसरा क्रमांक मिळवला होता.त्यांच्या या दुर्मीळ आणि प्रेरणादायक कामगिरीबद्दल मित्रमंडळी, नातेवाईक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. योग शिक्षक सुनील गुरव यांनीसुद्धा त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.