घर घर रक्तदाता, हर घर रक्तदाता…” या घोष वाक्य द्वारे रक्तमित्र ही संकल्पना राबवणार..जळगाव जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या पवित्र उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतपणे प्रमाणित झाली असून, संस्था रक्तदानासारखे महत्त्वाचे कार्य करण्याचे सज्ज झाली आहे अशी माहिती ॲड. जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.असोसिएशनचे उद्दिष्ट असे आहे की, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात किमान एक रक्तदाता तयार करणे हे आहे. यासाठी विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, शाळा-कोलेजांत मार्गदर्शन, सामाजिक संस्था व डॉक्टर्सच्या सहकार्याने आयोजन करण्यात येणार आहे. नियमित रक्तदात्यांची यादी, त्यांची माहिती व गरज पडल्यास तातडीने संपर्क साधण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर असोसिएशनची शाखा स्थापन केली जाईल व “रक्तमित्र” या घोष वाक्याद्वारे जनजागृती मोहिम राबवली जाईल.










