रिलेशनशिपमध्ये राहण्यास जबरदस्ती, अल्पवयीन मुलीने नकार देताच मुलाकडून ठार मारण्याची धमकी, मुलीला घरी नेले, पण…

गेल्या आठ महिन्यात संशयिताने अल्पवयीन मुलीला रिलेशन शिपमध्ये राहण्यास जबरदस्ती केली होती. मुलीने नकार दिल्याने त्याने कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होतीमैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने मुलीस धमकावत आपल्या घरी नेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात  बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पठाण (रा. जाकिर हुसेन हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयिताने अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत हे कृत्य केले. गेल्या आठ महिन्यात संशयिताने अल्पवयीन मुलीला रिलेशन शिपमध्ये राहण्यास जबरदस्ती केली. मुलीने नकार देताच त्याने कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळे कॉलनीतील एका मेडीसीन एजन्सीत व बोट क्लबच्या आवारात घेवून जात तिचा विनयभंग केला. तसेच मुलीस तो महाविद्यालयातून परस्पर आपल्या घरी घेवून गेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला. रात्री बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटूंबीयांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची कुणकुण लागताच संशयिताने नातेवाईकांना सोबत घेत मुलीस कुटूंबीयांच्या स्वाधिन केले असून तिने आपबिती कथन केल्याने याप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, कांदा बटाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना पेठरोडवरील आरटीओ परिसरात घडली. या घटनेत भामट्यानी अंगझडती घेत एकाच्या खिशातील तीस हजार रूपयांची रोकड लांबवली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादू चिमना भुसारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भुसारे हे त्यांचे मित्र यशवंत मल्हारी चौधरी यांना सोबत घेवून कांदा बटाटा खरेदीसाठी शहरात आले होते. बसचा प्रवास करून दोघे मित्र आरटीओ परिसरातील शारदा हॉस्पिटल समोरून शरदचंद्र मार्केट यार्डाच्या दिशेने पायी जात असताना ही घटना घडली. रस्त्याने दोघे मित्र पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांनी त्यांची वाट अडविली. पोलिस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी चेकिंगच्या बहाण्याने दोघा मित्रांची अंगझडती घेतली. यावेळी भुसारे यांच्या खिशातील बटाटे खरेदीसाठी आणलेली तीस हजाराची रोकड काढून घेत भामट्यांनी आरटीओ सिग्नलच्या दिशेने दुचाकीवर पोबारा केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.