तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की संजय भास्कर पाटील (रा. धानवड, ता. जळगाव) हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजविला. यावरून जयेश सुभाष वंजारी (रा. चिंचोली, ता. जळगाव) याने रागाने प्रतिक्रिया दिली. संजय पाटील यांच्यावर अचानकपणे हल्ला करत जयेशने त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात संजय पाटील यांना डोक्याला गंभीर इजा झाली.हल्ल्यानंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमी संजय पाटील यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार मुकुंद पाटील करीत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.