अवैध वाळू उत्खनन करणारा डंपर पकडला १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.

भडगाव शहरातील पेठ भागाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान एक डंपर जप्त करण्यात आला असून, जेसीबी मशिन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. संबंधित डंपर व जेसीबी मालक, तसेच चालकांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी विजय येवले यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे पथक रविवार, ६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता स्मशानभूमीजवळील गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी पोहोचले. यावेळी पिवळ्या रंगाच्या जेसीबी मशिनद्वारे वाळू उत्खनन करून ती पांढऱ्या-निळ्या रंगाच्या MH37 AA 8787 या क्रमांकाच्या डंपरमध्ये भरताना आढळले. महसूल पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच जेसीबी चालकाने मशीनसह पलायन केले.

जेसीबी मशिनचा चेसीस नंबर HAR3DXXAL01494624 असून, ते रविंद्र भगवान पवार (रा. भडगाव पेठ) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. डंपर चालकाने स्वतःचे नाव नामदेव रावन पाटील (रा. भडगाव पेठ) असे सांगितले व आपणच डंपरचा मालक असल्याचेही सांगितले.जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे:एक जेसीबी मशिन (किंमत अंदाजे ₹१०,००,०००) एक डंपर (किंमत अंदाजे ₹५,००,०००) अंदाजे सव्वा ब्रास वाळू (किंमत ₹६,०००) एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹१५,०६,०००याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०२(२), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ४८(७) आणि ४८(८) अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव करत आहे

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.