नांदगावला १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देणाऱ्या ७ भामट्यांना जमावाने बदडले, चार संशयित जखमी..

नांदगावला १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देणाऱ्या ७ भामट्यांना जमावाने बदडले, चार संशयित जखमी.. दोघांना जळगावात हलवले, ‘भारतीय बच्चो का बँक’ अशा नकली नोटा देत फसवण्याचा प्रयत्न..

प्रतिनिधी | बोदवड यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवून १ लाखाच्या बदल्यात ५ लाख देतो, असे आमिष दाखवून सात जणांनी फिर्यादीकडून १ लाख रूपये हिसकावून फसवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बोदवड तालुक्यातील नांदगाव येथे गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत चार संशयित जखमी झाले.

नाडगावच्या पोलिस पाटील प्रियंका भंगाळे यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांना माहिती दिली. गावात चार अनोळखी जणांना स्थानिकांनी चोरीच्या संशयावरून पकडून मारहाण केल्याचे सांगितले. माहिती मिळताच हवालदार अय्यूब तडवी व सहकारी घटनास्थळी धडकले. त्यांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले होते. यामुळे त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवले.

उपचारानंतर चौकशी करताना फिर्यादी संजयकुमार प्रेमचंद पिपलोदिया (४४, रा. सुसनेर, जि. आगर, मप्र) याने दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता नांदगाव उड्डाणपुलाजवळील निर्जन ठिकाणी आरोपींनी त्यांना बोलावून १ लाखाच्या बदल्यात ५ लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्यांनी लहान मुलांच्या खेळण्यातील ‘भारतीय बच्चो का बैंक’ अशा नकली नोटा देत फसवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर

संशयितांनी त्यांचा व मित्र गिरीराज पवार यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने १ लाख रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी सय्यद साबीर, अंकल अशोक पारधी, करम किरण बोदडे, प्रज्ञात समाधान पाटील, सैय्यद मेरिफ, नीलेश पुरळ, विकी गुरचळ अशा सात जणांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एमएच.१९-बीके.१५२९ ही दुचाकी जप्त केली. तपास उपनिरीक्षक गजानन रहाटे हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.