एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत बॅग लिफ्टींग करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात ८,००,०००/- रु रोख रक्कम हस्तगत.

एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत बॅग लिफ्टींग करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात ८,००,०००/- रु रोख रक्कम हस्तगत.

दि.१५/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे विलास मधुकर जाधव वय ६७ वर्ष रा. जुनी जोशी कॉलनी, जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ८४१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे अज्ञात आरोपी यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक सो. जळगांव यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांना आदेशीत केले होते.

त्यानुसार राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि.२३/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी नामे.

१) विजय शांताराम पाटील वय ४१ वर्ष रा. कलावसंत नगर, जळगांव

२) जितेंद्र छोटुलाल जाधव वय ४४ वर्ष रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगांव

यांना ताब्यात घेवुन त्यांनी फिर्यादी यांचे ताब्यातुन हिसकावुन नेलेली ८,००,०००/- रु ची रोख रक्कम त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आली आहे. नमुद आरोपी यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, तसेच पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, पोहेकॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, पोकों/सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे सर्व स्थागुशा जळगांव तसेच नेत्रम येथील पोकों/पंकज खडसे, पोकों/मुबारक देशमुख, पोकों/ कुंदनसिंग बयास व सायबर येथील पोकॉ/ गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी केली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.