धानोरा हद्दीत अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलीस पाटील निलंबित; त्याठिकाणी नियुक्त महसूल कर्मचारीही कारवाईच्या रडारवर?

धानोरा हद्दीत अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलीस पाटील निलंबित; त्याठिकाणी नियुक्त महसूल कर्मचारीही कारवाईच्या रडारवर?

एरंडोल : जळगाव तालुका महसूल प्रशासन धानोरा हद्दीत प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असताना व रस्त्याची पुर्ण वाट लागून शाळकरी मुलांचे व गावातील गरिब जनतेचे जनजीवन विस्कळीत होत असतानाही जळगाव तालुका महसूल प्रशासन हप्ते खोरीमुळे झोपेचे सोंग घेत होते तसेच दररोजचा हजारो ब्रास अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याने महसूल प्रशासनाला जागा करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात आवाज उठवला व महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली . माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी धानोरा हद्दीत उतरून अवैध वाळू साठ्याचे सुमारे अठराशे ब्रास अवैध वाळू साठ्याचे चित्रण व्हिडिओद्वारे जळगाव महसूल विभागासमोर आणले . त्यामुळे धानोरा बुद्रुक येथे गिरणा नदीकिनारी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत समारे अठराशे ब्रासच्या वर अवैध वाळु साठे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईत जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.तसेच ईतर दोषी महसूल अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार लटकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

धानोरा गिरणा नदी हद्दीत अवैध वाळू उपसा ठिकाणी नियुक्त महसूल कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून याप्रकरणी मंडळाधिकाऱ्यांसह तलाठी देखील कारवाईच्या रडारवर आहेत. अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची सूचना नोटीसी द्वारे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे हप्ते खोरी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. ज्या ठिकाणी महसूल विभागाचा गौण खनिज साठा उपलब्ध असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी शासनाच्या वतीने अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गावात ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात येते मात्र या ठिकाणीही ग्राम दक्षता समिती च्या कार्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून ग्रामदक्षता समितीवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नदीकिनारा जवळ आता शांतता पसरली आहे वाळू उपसा करणारे यंत्राच्या आवाजाने नदीकिनारी रहिवासी मशिनरीच्या आवाजाने पार त्रस्त झाले होते आता ते शांततेने झोपत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे जप्त वाळु घाटावर महसूल विभागाच्या वतीने या वाळु साठ्याचा लिलाव केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यासाठी निविदा काढली जाण्याची शक्यता आहे, तालुक्यातील धानोरा शिवारातील गिरणा नदी पात्रातून सुमारे 1800 ब्रास अवैध वाळू उपसा करून वाहतुकीसाठी काढण्यात आले होते या वाळु विषयी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी तक्रार केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश केले त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हरणकर गौण खनिज विभागाच्या नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी दिनांक 14 रोजी घटनास्थळी भेट देवून 1800ब्रास च्यावर वाळू साठा जप्त करण्यात आला,

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.