इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन..

इंग्रजी परिपत्रकांवर मनविसेचा संताप; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाला निवेदन..

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक क्र. २/२०२६ (दि. ७ जानेवारी २०२६) व अध्यादेश क्र. १३४ केवळ इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी राज्यात मराठी विद्यार्थ्यांशी संबंधित नियम इंग्रजीत काढणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप करत मनविसेने विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला आहे.

या संदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा. योगेश पाटील यांना निवेदन सादर करून आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. उत्तर महाराष्ट्रातील हजारो ग्रामीण, आदिवासी व सामान्य विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा थेट परिणाम होत असून इंग्रजीतील नियम बहुसंख्य विद्यार्थ्यांना समजत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला.

इंग्रजीत प्रसिद्ध केलेले परिपत्रक व अध्यादेश हा मराठी भाषेचा अवमान असून हा प्रकार मनसे कदापि सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी ही राज्याची राजभाषा असताना विद्यापीठ प्रशासनाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही मनविसेने ठेवला आहे.

मनविसेने विद्यापीठ प्रशासनासमोर ठाम मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये परिपत्रक क्र. २/२०२६ व अध्यादेश क्र. १३४ यांची अधिकृत मराठी आवृत्ती तात्काळ प्रसिद्ध करावी, यापुढे विद्यापीठातील सर्व परिपत्रके, अध्यादेश व अधिकृत पत्रव्यवहार मराठीतच काढावा, तसेच विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या व स्पष्ट मराठीचा वापर करावा, या मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा स्पष्ट इशारा विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) कल्पेश राजेंद्र पवार यांच्यासह जळगाव उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, उदय पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.