राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास; जळगावात मुस्लिम तरुणांचा ‘मनसे’त धडाक्यात प्रवेश..

राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास; जळगावात मुस्लिम तरुणांचा ‘मनसे’त धडाक्यात प्रवेश.. ​युसुफ खाटीक यांची सुप्रीम कॉलनी शाखाध्यक्षपदी नियुक्ती; लवकरच भव्य शाखा उद्घाटन..

​जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर आणि ‘राज’कारणावर विश्वास ठेवून जळगावातील सुप्रीम कॉलनी परिसरातील अनेक मुस्लिम तरुणांनी आज ‘मनसे’चा झेंडा हाती घेतला. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ​यावेळी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युसुफ जाकीर खाटीक यांची सुप्रीम कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या सोहळ्याला मनसे उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, उमेश आठरे यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अशपाक शहा, बादशहा महमूद शहा, आली खाटीक, साहिल शेख, इमरान शहा, जुबेर खाटीक, शोएब खाटीक यांच्यासह अनेक तरुणांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्षांनी या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​येत्या काही दिवसांत सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या भव्य शाखेचे उद्घाटन केले जाणार आहे. राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शेकडो मुस्लिम तरुण मनसेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.

​या प्रवेशामुळे जळगाव शहरात मनसेची ताकद वाढली असून, आगामी काळात सुप्रीम कॉलनी परिसरात पक्षाचे कार्य अधिक जोमाने विस्तारणार असल्याची माहिती नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक यांनी दिली आहे.

  • Related Posts

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.