इनकमींग नव्हे! ड्रेनेज टू बीजेपी! शिवराम पाटील..

इनकमींग नव्हे! ड्रेनेज टू बीजेपी! शिवराम पाटील..

महाराष्ट्र नव्हे आमच्या जळगाव जिल्ह्यातील, शहरातील कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांचा लोंढा भाजप मधे जात आहेत. जळगांव शहरातील महापौर, उपमहापौर, नगरसेवक एक गठ्ठा भाजप मधे गेले. काय करणार? मजबुरी आहे त्यांची. जळगाव शहरातील नगरसेवक राजकारण करीत नाहीत. नगरसेवक निवडून येणे हा त्यांचा अर्थाजनाचा व्यवसाय आहे. वरून सेवा म्हणून लेबल लावलें असले तरीही उद्देश अर्थाजन आहे. वरून किर्तन आतून तमाशा आहे.


भाजप सत्तेवर आल्यानंतर कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील लोकांना वाटत होते कि आपण लढू. पैसा वाटू. निवडून येऊ. पण ती आशा संपली आहे. निराश, हताश झाले आहेत. कारण आहे ईव्हिएम. कांग्रेसने इव्हीएम चा वापर शिघ्र मत मोजणी साठी केला होता.पण भाजप दोन पाऊले पुढे आहे. यांनी तर मत बदली साठी वापर केला आहे. म्हणजे मत कोणालाही दिले तर ते आमच्याच खात्यात जमा होईल. याचा अनुभव उमेदवारांना आला आहे. मतदारांना आला आहे. खूप गाजावाजा केला. पण निवडणूक आयुक्त, मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती सुद्धा दखल घेत नाहीत. येथे लोकशाहीचे सर्वच खांब कोसळले. एकमेव खांब उरला आहे, भाजप. आता लोकशाही म्हणजे एक खांबी तंबू बनला आहे.म्हणून बुद्ध, सुबुद्ध, प्रबुद्ध, निर्बुद्ध लोक भाजपच्या तंबूत आश्रय घेत आहेत. जे त्यांच्या जाती जमाती मधील महापुरूषांचे पोवाडे गातात ते सुद्धा आता हिन, दीन, लिन, क्षीण झाले आहेत. क्षत्रिय, राजपूत, मराठा, जाट,जय भीम, जय आदिवासी अशी सर्वच मंडळी हतबल झाली आहे. भाजपला शरण गेली आहेत. फक्त उत्तरेकडील यादव आणि दक्षिणेकडील द्रविड जाती जमाती तग धरून आहेत. सैन्य शत्रूला सामील झाले तरीही राहुल गांधी हे अजूनही लोकशाहीची खिंड लढवत आहेत. अशी बिकट अवस्था कधी काळी बृहद्रथ नंतर भारतात झाली असेल पण आता मात्र अत्यंत बिकट झाली आहे.


जेथे कांग्रेस चे आजी माजी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री भाजपाच्या तंबूत गेले तेथे जळगाव शहरातील महापौर उपमहापौर नगरसेवक यांची काय हिंमत भाजप विरोधात ठाम उभे राहू शकतील? जर राजकारण करायचेच नाही फक्त नगरसेवक निवडून धंदा करायचा आहे तर कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप मधे फरक कशाला करावा? ज्या मंडपात जेवण मिळेल तेथे मांडी घालून जेवण करणे इतकीच ती आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा. जळगाव महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. ते काम ईव्हिएम मधून सहज साध्य होत असेल तर उगीच आटापिटा कशाला करावा?तसा आता संशय राहिलेला नाही. खात्री झाली आहे. ईव्हिएम चे हॅंडलींग भाजप करणार. म्हणून भाजप चे नगरसेवक आणि झेडपी सदस्य निवडून येणार आहेत. इतरांनी अपेक्षा ठेवू नये. भाजप चे कोण उमेदवार द्यावेत इतकेच सिलेक्शन करणे आहे. इलेक्शन फक्त देखावा असेल. याला एक पक्षिय शासन प्रणाली म्हणतात. चीन, रशिया, उत्तर कोरिया येथे अशीच एकपक्षिय शासन प्रणाली आहे. आपल्याच पक्षातील उमेदवार सिलेक्ट करणे. आपणच इलेक्ट करणे. विरोधातील लोकांनी तसा कोणताही प्रयत्न करु नये. अशीच शासन प्रणाली अफगाणिस्तान मधे तालिबान संघटनेने लागू केली आहे.

भारतातील निर्बुद्ध, भुभुक्षू, अशिक्षित लोक या प्रवाहात वाहात जातात. पण आता तर बुद्धिमान, प्रबुद्ध, सुबुद्ध, उच्चशिक्षित ज्ञानी लोक डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक सुद्धा या प्रवाहात स्वताला वाहून घेत आहेत. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे बळ, धाडस, साहस, हिंमत, आत्मविश्वास त्यांच्यात उरलेला नाही. लवकरच ते जास्त पैसा कमवून भारत सोडून इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी , जपान कडे प्रयाण करणार आहेत. एन आर आय बनणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी आधीच जाहीर केले आहे. वन रॅंक, वन पेन्शन ! वन स्टेशन, वन न्युट्रीशन! वन पार्टी , वन इलेक्शन! वन लिडर, वन पावर!वन नेशन, वन रिलीजन!

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.