बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

धरणगाव तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झालेली आहे. येथे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत शेत रस्ते बनलेली नाहीत येथिल शेत रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण आहे. बाभुळगाव ते भामर्डी व बाभुळगाव ते उखळवाडी हे 4 कि.मी अंतराचे दोन मुख्य रस्ते असून या रस्त्याला लागून जवळ जवळ 400,500 एकर शेत जमीन येथील शेतकऱ्यांची असून या दोन मुख्य रस्त्याचे काम देखील अद्याप झालेले नाही. या दोन रस्त्यांचे काम शासनाने लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
शासनाच्या योजना केवळ नावालाच ठरत आहेत. बाभुळगाव येथील क्षेत्र रस्त्यांच्या प्रश्न एरणीवर आलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना अक्षरशः शेतात बैलगाडी जाणे तर दूरच तर पायी चालणे सुद्धा अवघड झालेले आहे. शेतकरी सर्व कडून आर्थिक संकटात सापडलेला असतांना शेत रस्त्याच्या प्रश्न शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. येथील शेत जमीन अतिशय सुपीक व फळबाग लायक आहे येथील जमीन पपई ,केळी, सिताफळ, पेरू, संत्री,अशी फळबाग लायक असताना सुद्धा त्या ठिकाणी रस्त्याच्या अभावी या पिकांची लागवड करणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकं घ्यावी लागत आहेत. बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीने नाही तर रस्त्याच्या दृष्टीने ठरवावे लागते की शेतात कोणते पीक घ्यायचे. कारण शेतात पिकवलेला माल घरी न्यायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला असतो. बाभुळगाव हे गाव गिरणा,अंजनी अशा दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे येथे पाणी मुबलक प्रमाणात असून जवळ गिरणा व अंजनी अश्या दोन नद्या आहेत शेत जमीन देखील अत्यंत सुपीक आहे पण शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे शेतमाल पिकवताना मोठा अडचणींच्या सामना करावा लागत आहे

पावसाळ्याच्या दिवसात तर सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे शेतात बैलगाडी जाऊ शकत नसल्यामुळे पिकांना वेळेवर खत,फवारणी व आंतरमशागतची कामे वेळेवर होत नसल्यामुळे त्याच्या परिणाम उत्पन्नावर होत असून परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाच्या डोंगर अधिकच वाढत आहे. शेतकऱ्यांनी उधारीवर घेतलेले बी बियाणे, बँकांची कर्ज सावकारांची कर्ज वेळेवर द्यायची कशी असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांवर येऊन ठेपला आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांच्या प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींनी अनेक मोठ– मोठी आश्वासने दिलेली होती या मध्ये त्या आश्वासनांची पूर्तता कुठेही होताना दिसत नाही शेतकऱ्यांच्या वापर केवळ निवडणुकीत मतदान पुरता होत आहे असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे बाभुळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याच्या प्रश्न लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
बाभुळगाव ते भामर्डी व बाभुळगाव ते उखळवाडी अंदाजे 4 कि.मी अंतराच्या या रस्त्याच्या कामाला आता पर्यंत सुरुवात झालेली नाही, शासनाने व लोकप्रतिनिधींनी रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थान कडून होत आहे.
1 ) लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना शेत रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासने दिली होती परंतु प्रत्यक्षात आश्वासनाची पूर्तता कुठेही होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी दिलेला शब्द पाळावा व शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. देविदास हिरामण पाटील प्रगतिशील शेतकरी
2) शेत रस्त्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांसाठी मोठी डोकदुखी ठरत असून रस्त्याअभावी शेतात योग्य पिकाची लागवड शेतकरी करू शकत नाहीत. शेत रस्ते मजबुत झाल्यास शेतकरी खऱ्या दुष्टीने समृद्ध होईल.
प्रताप हरी पाटील प्रगतिशील शेतकरी बाभुळगाव
3 ) पावसाळ्याच्या दिवसात चिखलामुळे बैल गाडी जाणे अवघड होत आहे त्यामुळे शेतीची फवारणी व अंतर मशागतीची कामे रस्त्यांमुळे खोळंबतात त्याच्या परिणाम उत्पन्नावर होत आहे. शासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावा. संजय माणिक पाटील प्रगतिशील शेतकरी








