गिरणा नदीला वाळु माफीयांचे ग्रहण ; अवैध वाळु वाहतुकी विरोधात एरंडोल महसूल ॲक्शन मोडमध्ये  मात्र कढोली हद्द समोरच धानोरा हद्दीत वाळु माफी यांचा हैदोस भर दिवसा व रात्री 70 ते 80 मशिनरीच्या साह्याने अवैध वाळु ऊपसा सूसाट..

एरंडोल : कांताई धरणातील पाण्यातअसलेल्या वाळूवर वाळू माफियांची वक्रदृष्टी पडल्यापासून कांताई धरणातील वाळूलाही ग्रहण लागले आहे कांताई धरणातील दोन्ही बाजूला वाळूमाफियांनी किनाऱ्यांचे संपूर्णतः सपाटीकरण करून भर दिवसा व रात्री बेधडकपणे मोठ्या प्रमाणात वाळु उपसा केला जात असल्याचे चित्र आहे पाण्यातून धानोरा हद्दीत 70 ते 80 मशनरी च्या साह्याने भर दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात वाळु उपसा केला जात असल्याने भविष्यात गिरणापात्रात पाण्याचे परपुलेशन न होता शेतीसाठी व पिण्यासाठी मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र जळगाव तालुक्यातील महसूल विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे..

वाळू माफियांच्या ओव्हरलोड वाळूच्या वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट ; शाळकरी मुलांचा व प्रवाशांचा रोज सात ते आठ किलोमीटरचा पायी प्रवास, खेडी कढोली हद्दी समोरच गिरणा नदी पात्रात 70 ते 80 वाळू उपसा मशनरी च्या साह्याने दररोज शेकडो ब्रास वाढू काढली जात असल्याचे चित्र आहे तसेच वाळु काढल्यानंतर 50 ते साठ ट्रॅक्टर व 40 ते 50 पेक्षा जास्त हायवा व डंपर च्या साह्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वाळु तस्करी केली जाते आश्चर्याची बाब म्हणजे वाळू तस्करीसाठी राजकीय वरदहस्त असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे तसेच वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची पूर्णतः वाट लागल्याने एसटी बसेस गावात न येता जळगाव तालुक्यातील धानोरा गावापासून ते मोहाडी जवळ रेल्वेच्या चार पुलाव पर्यंत चार किलोमीटरच्या अंतरावर एसटी महामंडळाची बस थेट धानोरा पर्यंत न येता बस चार पुलापर्यंतच थांबत असल्याने पुलाव ते धानोरा हे अंतर तीन ते चार किलोमीटरचे अंतर असून ग्रामस्थ व शाळकरी तसेच जळगाव येथे कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींना रोजच सात ते आठ किलोमीटरचा पायी प्रवास करून जीव धोक्यात घालून त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.


एरंडोल महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये वैजनाथ टाकरखेडा गिरणा नदी पात्रात व कढोली हद्दीत धरणाच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्याने एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या आदेशान्वये महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावल्याने वाळूमाफीयांचे धाबे दणानाले आहे कांताई धरणाच्या पाण्यातून अवैध वाळु उपसा एरंडोल महसूल प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला आहे कडोली येथे मंडळ अधिकारी संजय शिरसाठ तलाठी नितीन पाटील व कोतवाल जितेंद्र बडगुजर यांच्यासह एरंडोल येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्याही ड्युटी लावण्यात आली आह. मात्र कढोली हद्दीसमोरच जळगाव तालुक्यातील धानोरा हद्दीत भरदिवसा व रात्री 70 ते 80 मशिनरी यंत्रांच्या साह्याने भरमसाठ शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा केला जात असल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसानीसह पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.