बोगस मतदारांसाठी मनसे राबविणार शोधमोहिम : कार्यकर्ते घरोघरी जाणार !

नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मनसे सज्ज, जिल्हा बैठकीत सविस्तर चर्चा..

जळगांव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्ष नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी व निवडणूक रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हाभरातील सर्व १५ तालुक्यांतील पदाधिकारी, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आगामी निवडणुका म्हणजे संघटनशक्ती दाखवण्याची खरी वेळ आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदार यादी नीट तपासावी, दुबार नावं व अनियमितता शोधून काढावी. जिल्ह्यातील रिक्त पदांची पुनर्नियुक्ती आणि आवश्यक संघटनात्मक बदल करून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी, यासाठी जिल्हाध्यक्षांनी अहवाल तयार करावा.”

बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे व कमलाकर घारू यांनी आपल्या विभागातील संघटनस्थिती व निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. यावेळी प्रत्येक प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठक घेऊन जनसंपर्क अभियान, युवकांचा सहभाग आणि घराघरांत मनसेचा संपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीचा शेवट करताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले, “मनसेची ओळख म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभं राहणं. आगामी निवडणुकांत मनसे हा पर्याय नाही, तर आवश्यकता ठरेल.

जिल्हा बैठकीला उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे, जळगावचे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, बोदवडचे अनिल गंगतीरे, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील,एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, भुसावळचे शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे राजेंद्र लिंगायत,जळगांव उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बर्हाटे,वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रजाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कल्पेश पवार, श्री कृष्णा विठ्ठल दुंदुले, ऐश्वर्य श्रीरामे, ॲड सागर शिंपी, विकास पाथरे, मंगेश भावे, भूषण तळेराव, समाधान माळी, रामकृष्ण पवार, कन्हैया पाटील, सतीश सैंदाणे, गणेश कुंभार, अमोल माळी, विनोद पाटील, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, प्रदीप पाटील, शैलेश चौधरी, भूषण ठाकरे, राहुल चव्हाण, दिनेश मराठे, पवन कोळी, महेश सुतार, चेतन नैरानी, कृष्णा दुंडुळे, अरुण गव्हाणे, भूषण पाटील, भैय्या लिंगायत, प्रतीक सोनवणे, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, वैभव सुरवाडे, दीपक सोनवणे, दशरथ सपकाळे, तुषार वाढे, अभिषेक बोरसे, रवी कोळी, करण गंगतीरे, सागर पाटील, विशाल कोळी, शुभम पाटील, वाल्मीक जगताप, सुनील माळी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी जळगाव जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांचे आभार मानले.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..