मुंबईत १०० वर्षात घडलं नाही ते काल घडलं, ठिकठिकाणी जलमय; मुंबईकरांची पायपीट.
मान्सून वेळेआधीच मुंबईत धडकला, गेल्या ७५ वर्षांतील हा विक्रमी प्रवास ठरला. मुंबईत १०० वर्षात कधीही न घडलेलं काल घडलं. जोरदार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शहरातील वाहतूक व्यवस्था…
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच गळती, DCM एकनाथ शिंदेंसमोरच ‘टिप टिप बरसा पानी’.
राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे शिंदे यांनी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन…
राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल; ‘या’ तारखेपासून पाऊस ओसरणार, असा आहे १० दिवसांचा अंदाज.
राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी, त्याची गती मंदावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २७ मे पासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते.मुंबई : राज्यात…
तिसरी भाषा नाहीच! राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून दोनच भाषा; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भातील निर्णय स्थगित केला आहे. यापूर्वी हिंदी भाषेला विरोध झाल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी अनिवार्य…
भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे
अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही,…
बिलावरुन वाद, गावरान ढाबा मालकाला संपवलं, बीडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव…
पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !
पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…
न्यू इंडिया बँक घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींच्या तब्बल १६७ कोटींच्या मालमत्तांवर टाच.
महादंडाधिकारी न्यायालयाने २१ मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी दिली असून, मुंबईतील हा पहिलाच प्रकार आहे. न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या २१ मालमत्तांवर टाच आणण्याची परवानगी न्यायालयाने दिली…
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे पुणे महापालिकेने मागितला खुलासा.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी प्रसूतीवेळी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. आमदार अमित गोरखे यांनी यानंतर रूग्णालयाच्या प्रशासनावर काही गंभीर आरोपही केले. पुणे महापालिकेने घटनेची दखल घेत रुग्णालयाकडून…
पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला.
छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली…


















