भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही, भारतातील काही वृत्तवाहिन्या “चर्चासत्र” किंवा “डिबेट” या नावाखाली पाकिस्तानातील पत्रकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, तथाकथित विश्लेषक यांना आमंत्रित करतात.

हे पाहून दुःख आणि संताप दोन्हीही वाटतो की, आपल्या देशात बसून शत्रुराष्ट्राचे प्रवक्ते आपल्या देशाच्या नितीचा, सैन्याचा व सरकारचा अपमान करतात. त्यांचे वक्तव्य उघडपणे भारतविरोधी असून भारतीय जनतेच्या भावना दुखावणारे असते. अशा कृतींमुळे दहशतवादी कारवायांना अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन मिळते आणि देशांतर्गत एकतेला बाधा निर्माण होते. त्यामुळे, आपणास नम्र विनंती करतो की, 1. भारतीय वृत्तवाहिन्यांना पाकिस्तानातील पत्रकार, विश्लेषक व राजकीय प्रतिनिधींना चर्चासत्रांसाठी आमंत्रित करण्यास सक्त मनाई करणारा आदेश तातडीने काढावा. 2. जर कोणी वाहिनी याचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 3. भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे देशात प्रसारण होऊ नये याची जबाबदारी ठराविक प्राधिकरणांवर सोपवावी.देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व व जनतेच्या भावना यांचा विचार करता वरील मागणी तातडीने कृतीत आणणे अत्यावश्यक आहे. आपल्याकडून लवकरात लवकर योग्य ती पावले उचलली जातील अशी अपेक्षा ठेवतो.ॲड. जमील देशपांडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..