राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल; ‘या’ तारखेपासून पाऊस ओसरणार, असा आहे १० दिवसांचा अंदाज.

 राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी, त्याची गती मंदावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २७ मे पासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते.मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. अशातच हवामान खात्याने महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबाबतमहत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा अफवांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.वातावरणातील बदलांमुळे गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुक्काम ठोकला आहे. रविवारीदेखील पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. दिवसभरात अधूनमधून विश्रांती घेऊन हलक्या आणि मध्यम सरी पडत राहिल्या. सुट्टीसाठी राखून ठेवलेली कामे पावसामुळे रेंगाळली. अनेक जण कारने बाहेर पडल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वातावरणातील घडामोडींमुळे कमाल तापमानातही घट झाली होती. हवेतील गारवा वाढल्यामुळे वातावरण आल्हाददायक होते. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..