मुंबईत १०० वर्षात घडलं नाही ते काल घडलं, ठिकठिकाणी जलमय; मुंबईकरांची पायपीट.

मान्सून वेळेआधीच मुंबईत धडकला, गेल्या ७५ वर्षांतील हा विक्रमी प्रवास ठरला. मुंबईत १०० वर्षात कधीही न घडलेलं काल घडलं. जोरदार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.अपेक्षित वेळेपूर्वीच देशात दाखल झालेला मान्सून केरळनंतर वेगाने आगेकूच करत सोमवारी मुंबईत धडकला. मुंबईत मान्सून दाखल होण्याचे सर्व निकष पूर्ण झाले असून, गेल्या ७५ वर्षांमधील मान्सूनचा हा विक्रमी प्रवास आहे. एरवी मान्सूनच्या आगमनाने सुखावणाऱ्या मुंबईकरांना या पावसाने अक्षरशः जेरीस आणले. मान्सूनने आगमनालाच दाणादाण उडवल्याने यंत्रणांची पुरेशी तयारी नसल्याचे उघड झाले.मुंबईतील महामार्ग आणि द्रुतगती मार्ग तसेच उपनगरी रेल्वे या पहिल्याच पावसात कोलमडली. त्यामुळे अनेकांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. विशेष म्हणजे या पावसाचा परिणाम मेट्रो वाहतुकीवरही झाला. कर्जत तालुक्यात वीज पडून एका तरुणाचा, तर विरारमधील एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.

या महिलेची दोन लहान मुले किरकोळ जखमी झाली आहेत. कर्जत तालुक्यातही एका महिलेसह दोन जण जखमी झाले. दापोलीत ४५ वर्षीय तरुण नदीत वाहून गेला.हवामान खात्याने मुंबईला सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे, पहाटेपासून पावसाचे आगमन झाले आणि काही वेळातच मुंबईसह महानगरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळू लागला. रविवारी रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा हा जोर दुपारी ४ पर्यंत कायम होता.मुंबईत रविवारी सकाळी ९.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या २४ तासांत कुलाबा केंद्रावर १३५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रावर ३३.५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. सोमवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे १४४.३ आणि सांताक्रूझ येथे ७४.३ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. ठाणे, नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली.

मुंबईत मान्सूनचे आगमन लवकर झाले, मे महिन्यात १०० वर्षातील सर्वात जास्त पाऊस पडला. १०० वर्षात कधीही न पडलेला इतका पाऊस काल सोमवारी मुंबईत मे महिन्यात झाला.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कित्येकांनी घरून काम करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. तर, ज्यांना व्यवसाय, नोकरीसाठी घराबाहेर पडणे भाग होते, त्यांना बरेच हाल सोसावे लागले. पश्चिम रेल्वेने चांगल्या प्रकारे तग धरला, तरीही ती लोकलसेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने होती. पावसाच्या जोरदार तडाख्याने मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचे पितळ उघडे पडले. या पावसाने दादर, हिंदमाता, शीव, भायखळा, सँडहर्स्ट रोड, मशीद, वडाळा, अंधेरी, मंत्रालय परिसर, हुतात्मा चौक, चर्चगेट स्थानक अशा कित्येक भागांत पाणी साचल्याने पादचारी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..