बीड हादरलं! गाडी डिव्हायडरवर चढली, जीव वाचताच सगळे उतरले, मागून ट्रकने सहाही जणांना चिरडलं

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ गढी पुलावर भीषण अपघात झाला. एका एसयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर, गाडीतील लोक ती काढण्यासाठी बाहेर आले असताना भरधाव ट्रकने सहा जणांना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील Gadhi Bridge येथे अंगावर काटा आणणार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचाा जागेवरच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गाडीचा अपघात झाला त्यावेळी वाचले कोणलाही कसलाही इजा झाली नाही. मात्र त्यानंतर दुसऱ्यांदा झालेल्या अपघतामध्ये एकाच वेळी सहा जणांचा मृत्यू झाला. गेवराईच्या शहराजवळ असणाऱ्या Beed Gadhi Bridge Accident झालेला आहे.

सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.बीडमधील गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने सहा जणांना जबरदस्त धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री झाला आहे. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

ट्रकने दिलेली धडक इतकी भीषण होती की, सहाजण दूरवर फेकले गेले. सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. अपघात झाल्यावर संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला. या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले पण त्यानंतर मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. या अपघातामध्ये सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले.

  • Related Posts

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार..

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नेत्यांनी रोजच राजकारणाचा बाजार मांडायचा आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचायचं असं अजून कुठंवर चालणार? याचं कोडं काय सुटेनासं…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.