अजित पवार पाहणीसाठी गेले अन् थेट मदतीची घोषणा करून टाकली, नुकसानग्रस्तांना किती पैसे मिळणार?

 बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.मागील तीन-चार दिवसांत बारामती परिसरात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यात भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसंच मदतीबाबतची घोषणाही केली आहे.अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची घोषणा केली असून शेतकऱ्यांना काही काळ संयम ठेवावा, असं आवाहन केलं आहे. “ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बारामतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल, हे का एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे, शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठवडाभरात मुसळधार पाऊस बरसला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाले असून नुकसानग्रस्तांना आता शासकीय मदत कधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.