आम्ही नीलेश चव्हाणला पकडलंय, गाडीच्या डिक्कीत डांबून ठेवलंय, पोलिसांना फोन आला पण…

 “फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय” असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता पुण्यातील 24 वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पकडल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे येथील नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय” असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांचा ताफा तातडीने त्या ठिकाणी पोहोचला. मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल, या हेतूने त्याने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन केल्याची माहिती आहे. संतोष दत्तात्रय गायकवाड, वय 33 वर्ष, याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फोन करणाऱ्या आरोपीने ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याला पकडून ठेवलं आहे. त्याच्या जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करुन गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली.ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे सापडून आली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नीलेश चव्हाण याला आरोपी करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे हिचे नऊ महिन्यांचे बाळ जनकराजे हे नीलेशच्या ताब्यात होते. वैष्णवीचे नातेवाईक हे बाळ आणण्यासाठी त्याच्याकडे गेले असता, नीलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हाकलून लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तेव्हापासून फरार असून पोलिसांची सहा पथकं त्याच्या मागावर असल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.