40 वर्षांची महिला मर्जीने जम्मूला गेली, 23 वर्षीय तरुणावर अत्याचाराच गुन्हा का? कोर्टाचा पोलिसांना सवाल.

‘महिला आरोपी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत स्वतःच्या मर्जीने गेली असताना आरोपीवर बलात्काराचा गुन्हा कसा काय दाखल केला,’ असा प्रश्नही खंडपीठाने दिल्ली पोलिसांना विचारला. ‘पीडित महिला लहान बाळ नाही आणि टाळी एका हाताने वाजत नाही,’ असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने 40 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणातील 23 वर्षीय आरोपीला बुधवारी हंगामी जामीन मंजूर केला. तसेच, आरोपी नऊ महिन्यांपासून तुरुंगात असूनही त्याच्यावर अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.आरोपीवर करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्याविरोधात आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणाची सुनावणी न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.महिला आरोपी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत स्वतःच्या मर्जीने गेली असताना आरोपीवर बलात्काराचा गुन्हा कसा काय दाखल केला,’ असा प्रश्नही खंडपीठाने दिल्ली पोलिसांना विचारला.‘टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही कोणत्या आधारे कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला. ती काही लहान बाळ नाही. ही महिला 40 वर्षांची आहे. ते एकत्र जम्मूला गेले. मग तुम्ही 376 कलम का लावले. ही महिला जम्मू येथे सात वेळा गेली आणि तिच्या पतीलाही त्याची काळजी नव्हती,’ असेही निरीक्षण खंडपीठाने या वेळी मांडले.

आरोपीने नऊ महिन्यांचा तुरुंगवास भोगला असल्याने त्याला हंगामी जामीन मिळण्यास पुरेसे कारण आहे, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला कनिष्ठ न्यायालयात हजर करण्याचे आणि अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतरिम जामीन मंजूर करण्याचे निर्देश दिले. मात्र आरोपीने स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये आणि महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असेही खंडपीठाने बजावले.सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आरोपीचा उल्लेख करून ‘अशा व्यक्तींच्या प्रभावाखाली कोणी येते का?, असा प्रश्नही खंडपीठाने विचारला.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.