विठुरायाची कृपादृष्टी ! पंढरपूरला जाताना गाडी दुभाजकावर धडकली, पण अपघातानंतर कमाल घडली, आठही भक्त बचावले.

कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि कारमधील आठ जण जखमी झाले.छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री (ता. अंबड) शिवारात बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यात कारमधील 8 जण जखमी झाले आहेत. एअर बॅग वेळीच उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या अपघातामध्ये हौसाबाई हरिश्चंद्र तांबे, वय ७०, कौशल्या भिमराव जाधव, वय ७०, मिरा रमेश लहाणे, वय ४०, प्रेरणा रमेश लहाणे, वय २०, सरला विष्णू तांबे, वय ३०, भाग्यश्रीबाई कल्याण तांबे, वय ६८, वैभव विष्णू तांबे, वय १८, वृषाली विष्णू तांबे, वय १७, सर्व रा. तांबे डोणगाव,

ता. पैठण, हल्ली मुक्काम संभाजीनगर असे अपघातामधील जखमींची नावे आहेत.याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील तांबे दाम्पत्य हे मागील काही वर्षांपासून नोकरी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी तांबे आणि लहाणे दाम्पत्य हे अर्टिगा कार क्रमांक एम एच २० जीई ३७२४ हिने पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते.धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना कार बाहेर काढलं आणि खाजगी वाहनाद्वारे तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांनी ताबडतोब जखमींवर प्राथमिक उपचार सुरू सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले आहे. या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.