महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर.मुंबई, दि. 12 जून 2025: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश कमिटी स्तरावर सध्या विचारविनिमय सुरू असून, राज्यभरात विभागनिहाय बैठका घेऊन समाजकार्याची आवड आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तींना या महासंघात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघ ही राज्यातील सर्वात जुनी आणि माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ असलेली संघटना आहे. या संघटनेचे कार्य आणि विचारप्रणाली राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्रिमंडळापर्यंत परिचित आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष  अनिल भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10-12 वर्षांपासून संघटनेचे कार्य नियमितपणे आणि जोमाने सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरात अनेक मेळावे आणि कार्यक्रम यशस्वी झाले असून, आता नव्याने संघटनेचे काम अधिक मजबूत करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.या संघटनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गाव आणि तालुका पातळीवर मान-सन्मान मिळण्याबरोबरच समाजाचा पाईक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या महासंघात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजकार्यात रुची असणाऱ्या व्यक्तींनी महासंघाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होऊन राज्यभरातील बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.राजकारणात यशस्वी होण्यासाठी समाजाची पाठबळ असणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींच्या मागे समाज उभा असतो, त्यांनाच राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे तिकीट आणि महत्त्वाची पदे मिळतात. त्यामुळे माळी समाजातील प्रत्येकाने महाराष्ट्र माळी समाज महासंघात सहभागी होऊन समाजकार्य आणि संघटन मजबूत करण्यासाठी पुढे यावे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी महासंघाच्या प्रदेश कमिटीशी संपर्क साधावा. : महाराष्ट्र माळी समाज महासंघ, प्रदेश कमिटी 8788964050,सदर क्रमांकवर माहिती किंवा सूचना फक्त वाटसप करावे

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..