तुमचे बाबा गेले, उल्हासनगरमध्ये जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं, अंत्यसंस्काराची तयारी करताना चमत्कार.

 उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्तीला जिवंत असतानाच मृत घोषित केलं आणि डेथ सर्टिफिकेटही दिलं. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना संशय आला आणि रुग्णालयात दाखल केलं.रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांकडून आतापर्यंत धक्कादायक घटना घडल्या आहे. ऑपरेशवेळी कधी पोटात टॉवेल राहणं, तर कधी कैची राहणं अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता असा भयंकर प्रकार समोर आलाय, की डॉक्टरांनी जिवंत माणसालाच थेट मृत म्हणून घोषित केलं आहे. उल्हासनगरमधील एका रुग्णालयातून भयंकर प्रकार समोर आला आहे. व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अभिमान तायडे (वय ६५) या जिवंत असलेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिलं आणि मृत घोषित केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर याप्रकारामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर विरोधात नेमकी काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.अभिमान तायडे (वय ६५) यांची प्रकृती काही काळापासून ठिक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान ते अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने रिक्षाने उल्हासनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी रिक्षामध्येच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर रुग्णालयातून थेट डेथ सर्टिफिकेट देण्यात आलं. त्यानंतर नातेवाईकांनी ६५ वर्षीय अभिमान यांना घरी नेलं.आपला माणूस गेल्याचं समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना नातेवाईकांच्या लक्षात आलं, की अभिमान यांच्या छातीची धडधड सुरू आहे.

त्यानंतर त्यांना तातडीने पुन्हा उल्हासनगरमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले. त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.या प्रकरणात डॉक्टरांकडून चूक झाल्याचं मान्य केलं आहे. रुग्णाची नस मिळाली नाही, तसंच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. चुकीने मृत घोषित केलं, याबद्दल डॉक्टरांनी खेद व्यक्त केला आहे. मात्र अशाप्रकारे हलगर्जीपणा करुन एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित केल्याने डॉक्टरच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.