बीड हादरलं! गाडी डिव्हायडरवर चढली, जीव वाचताच सगळे उतरले, मागून ट्रकने सहाही जणांना चिरडलं
बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ गढी पुलावर भीषण अपघात झाला. एका एसयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर, गाडीतील लोक ती काढण्यासाठी बाहेर आले असताना भरधाव ट्रकने सहा जणांना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू…
मुंबईत १०० वर्षात घडलं नाही ते काल घडलं, ठिकठिकाणी जलमय; मुंबईकरांची पायपीट.
मान्सून वेळेआधीच मुंबईत धडकला, गेल्या ७५ वर्षांतील हा विक्रमी प्रवास ठरला. मुंबईत १०० वर्षात कधीही न घडलेलं काल घडलं. जोरदार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शहरातील वाहतूक व्यवस्था…
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच गळती, DCM एकनाथ शिंदेंसमोरच ‘टिप टिप बरसा पानी’.
राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे शिंदे यांनी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन…
तिसरी भाषा नाहीच! राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून दोनच भाषा; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भातील निर्णय स्थगित केला आहे. यापूर्वी हिंदी भाषेला विरोध झाल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी अनिवार्य…
ऐतिहासिक गोपाळगडावर पुरातत्व विभागाची मोठी कारवाई; शिवप्रेमींची मागणी अखेर पूर्ण, प्रकरण काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम अखेर प्रशासनाने जमीनदोस्त केले. पुरातत्व विभागाने केलेल्या या कारवाईत दुकान, घर, पाण्याची टाकी आणि इतर बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील…
जंजीरा किल्ला पर्यटनासाठी बंद! पर्यटकांना करावी लागणार उद्यापासून ४ महिने प्रतीक्षा, पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्डाचा निर्णय.
पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी उद्या(सोमवार दिनांक २६मे २०२५)पासून पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला…
“अहो.. हिच्या पोटात बाळ वाढतंय”, १३ वर्षांच्या कॅन्सर पीडितेवर मदतनीसाकडूनच अत्याचार.
बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल जप्त.
दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी…
अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार, Nalasopara मध्ये दिवसाढवळ्या थरार.
सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला. तसेच त्याच्या शरीरावर इतरत्रही वार करुन त्यास गंभीररित्या जखमी केले. सध्या बापाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात…
दाणेवाडी येथील युवकाच्या निर्घृण खुनाचा उलगडा.
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत एका संशयित…


















