अयोध्याकडे जात असतांना राज्यातील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात : ४ ठार !

जगभरातील भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहे. तर कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याकडे जाणाऱ्या नांदेडच्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रविवारी पहाटे उत्तर प्रदेशात अपघात झाला. ही मिनी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या खासगी बसला धडकली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृतांमध्ये नांदेडमधील तीन, तर वसमत (जि. हिंगोली) येथील एका महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बाराबांकीत पूर्वांचल एक्स्प्रेस रोडवर हा अपघात झाला. मृतांमध्ये सुनील वरपडे (५०), अनुसया वरपडे (८०) या मायलेकासह दीपक गोदले स्वामी (४०, तिघे रा. नांदेड) व जयश्री चव्हाण (५०, रा. वसमत) यांचा समावेश आहे.१० फेब्रुवारीच्या रात्री नांदेडच्या छत्रपती चौकातून एकमेकांचे नातेवाईक असलेले २३ जण प्रयागराजला गेले होते. रविवारी पहाटे ५.३० वाजता ते अयोध्येच्या दिशेने निघाले होते. प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीपत्रा पोलिस ठाण्यात हद्दीमध्ये पूर्वांचल मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त खासगी बसवर धडकलेली टेम्पो ट्रॅव्हलर अक्षरश: चक्काचूर झाली होती.

  • Related Posts

    जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !

    जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्… Video पाहून सर्वच थक्क.

    चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्…  Video पाहून सर्वच थक्क.

    आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं.

    आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं.

    नियती! धावत्या रेल्वेवर दगड मारला अन् ५ वर्षांच्या आरोहीने जीव गमावला, आई-वडिलांचा आक्रोश पहावेना.

    नियती! धावत्या रेल्वेवर दगड मारला अन् ५ वर्षांच्या आरोहीने जीव गमावला, आई-वडिलांचा आक्रोश पहावेना.

    जंगलात गेला, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ अन् अल्पवयीन कबड्डीपटूने आयुष्य संपवलं, दोन दिवसांनी…

    जंगलात गेला, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ अन् अल्पवयीन कबड्डीपटूने आयुष्य संपवलं, दोन दिवसांनी…