बायकोला बोलल्यामुळे सटकली, घराच्या बाल्कनीमध्ये भावांची झटापट, भयंकर शेवट.

पुण्यात पत्नीला अपशब्द उच्चारल्याने झालेल्या वादामध्ये एक तरुण बाल्कनीतून पडून मृत झाला. मृताचे नाव अमर देशमुख असून, त्याच्या चुलतभावाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची तक्रार मोहपत साहारे यांनी केली आहे. घटनेवेळी ते धायरी येथील मतेनगरात राहत होते. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला अपशब्द उच्चारल्याने झालेल्या झटापटीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मोहपत साहारे असं मृत तरूणाचे नाव आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या भांडणात झालेल्या झटापटीत धक्का दिल्याने मोहपत हा थेट बाल्कनीतून खाली पडला. कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत तरुणाला ढकलल्याने बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) धायरी येथे घडली. अमर किसन देशमुख (वय ३५, रा. मतेनगर, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या चुलतभावाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.

राजू भुरेलाल देशमुख (रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरी) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी मोहपत हरिराम साहारे (वय ३६, रा. धायरी) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजू आणि त्याचा चुलतभाऊ अमर मूळचे मध्य प्रदेशातील आहेत.दोघेही एका खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नीबद्दल अपशब्द उच्चारल्याने राजू आणि अमर यांच्यात वाद झाले. त्यानंतर अमर हा राजूच्या अंगावर धावून गेला. झटपटीत राजूने अमरला धक्का दिल्यामुळे अमर सदनिकेच्या बाल्कनीतून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रहिवाशांनी जखमी अमरला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारांदरम्यान अमरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजू घरातून बाहेर गेला, होता. दुसऱ्या दिवशी अमरचा मृत्यू झाल्याची माहिती राजूला मिळाली. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे निरीक्षक गुरुदत्त मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी रिक्षाचालकावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ फेब्रुवारीला रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान संगमवाडी येथे घडली. या प्रकरणी खडकी बाजार पोलिस वसाहतीतील ४० वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यावरून सुरेंद्र साहेबलाल यादव (वय ३०, रा. संगमवाडी, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल झाला. रस्त्यात रिक्षा लावल्याबद्दल विचारणा केल्याच्या रागातून आरोपीने तक्रारदारांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.