सुरेश धस यांचे संजय शिरसाट यांनी टोचले कान, म्हणाले, प्यादे वजीर कोण ते….

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोर्चा निघाला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी आरोपीला शिक्षा होईपर्यंत सरकार थांबणार नाही असे म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार संबंधित यंत्रणा तपास करत आहे. मराठवाड्याच्या पाण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे.मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच मोठे भाष्य केले आहे. परभणी येथील मोर्चावर बोलताना ते दिसले. शिरसाट हे म्हणाले की, परभणीत आज सरपंच हत्ये प्रकरणी मोर्चा निघाला. प्रत्येकाला वाटत प्रकरणाचा छडा लागला पाहजे. जो आरोपी आहे त्याला सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आरोपीला फाशी लागेपर्यंत सरकार थांबणार नाही. आरोपी प्यादे वजीर कोण आहे ते यंत्रणा तपास करून काम करत आहे. तपास यंत्रणेत हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे सुरेश धस यांच्याबद्दल बोलताना शिरसाट यांनी म्हटले.

कोण मुख्य आरोपी तपासात येऊ द्या, आरोप केला अन् फाशी देता येत नाही. तातडीने कारवाई होत नसते. तपासात कुणीही अडथळा अनु नये. आक्षेप तक्रार असेल तर तपास करायला भेटून सांगावं. पुण्यात वरदहस्त असेल तर तपासात समोर येईल. कराड पकडला गेला ते चालत नाही. काय केले पाहिजे याच मार्गदर्शन वडेट्टीवार यांनी केले पाहिजे. असे म्हणते शिरसाट यांनी वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.संजय राऊत सगळ्या भूमिकांना सहकार्य दाखवतील. विधानसभेत जनतेने उपचार केले औषध दिल्याने ते नरमाईची भूमिका दाखवतील. पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, अजित पवार यांच्या ताफ्यात ती गाडी होती. मग काय झालं. शिंदेंच्या ताफ्यात 100 वाहने असतात. ताफ्यात वाहने असणे म्हणजे अजित पवार यांची बदनामी होत नाही. अजित पवार विदेश दौऱ्यावर आहेत .सोमवार किंवा मंगळवारी सर्व पालकमंत्र्यांची नावे जाहीर होतील.मराठवाड्याला पाणी मिळणार नाही याची मांडणी चुकीची आहे. या समितीत मराठवाड्यातील पाणी तज्ञ नाही. याविरोधात आम्ही आहेत. सुप्रीम कोर्टात जे लोक हरले त्यांनी हा प्रयत्न केला. याबाबत आम्ही एकत्र येणार आहे. आमच्या हक्काचं पाणी कुणी थांबवू शकत नाही, कोर्टाचे आदेश पाळणे बंधनकारक आहे. हक्काचं पाणी कुणी थांबवू शकतं नाही, असे असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.